-
--
हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा एल निनो सक्रिय होण्याचे संकेत दिसत असून IOD प्रणाली सध्या निष्क्रिय आहे. त्यामुळे विदर्भात मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कमी पावसाचा परिणाम खरीप हंगाम, पाणी साठे आणि शेती नियोजनावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि पीक निवड करताना घाई न करता अधिकृत हवामान खात्याच्या अंदाजाचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसातील अनिश्चितता लक्षात घेता कृषी विभाग आणि हवामान विभागाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणारी पिके, जलसंधारण आणि योग्य पीक व्यवस्थापन यावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.