“Courage allows us to face challenges with confidence and transform obstacles into opportunities for growth.”
"With faith in God and confidence in yourself, nothing is impossible."
The Less Competent should not judge the More Competent.
“If you are patient in one moment of anger, You will escape a hundred days of sorrow.”
“You will face many defeats in life, but never let yourself be defeated.”
Keep doing your best every day & if no one is proud of you, be proud of YOURSELF!
नागपुर ग्रामीण दो आरोग्य केंद्रों का संचालन ।
Share News:
Good Morning Nagpur
नागपूर ग्रामीणमध्ये दोन नव्या आरोग्य उपकेंद्रांचे लोकार्पण
बोरखेडी (फाटक) व देवळी (गुजर) ता.नागपूर येथे आरोग्य सुविधांना मिळणार बळकटी
नागपूर, दि. १५ ऑगस्ट २०२६ :
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महारष्ट्रात एकूण १२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण आभासी (Online) करण्यात आले. त्यात नागपूर जिल्हयातील २ आरोग्य संस्थांचा समावेश होता. सदर नागपूर ग्रामीण तालुक्यातील बोरखेडी (फाटक) आणि देवळी (गुजर) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींचे लोकार्पण आज मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचे हस्ते करण्यात आले. सदर लोकार्पण प्रसंगी मा.ना.श्री.प्रकाश् आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री, महसुल, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नागपूर मा.ना.ॲङ आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, वित्त, नियोजन, महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य. तसेच मा.श्री.समीर मेघे, स्थानीक आमदार हिंगणा मतदार संघ् यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. या दोन्ही आरोग्य उपकेंद्रांमुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे.
या आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, कुटुंब कल्याण सेवा, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक जनजागृती अशा विविध सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी दूरच्या ठिकाणी जावे लागू नये, तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या दोन अत्याधुनिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींची उभारणी करण्यात आली आहे.
बोरखेडी (फाटक) व देवळी गुजर येथील आरोग्य उपकेंद्रांमुळे परिसरातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच प्राथमिक आरोग्य सेवा मिळणार असून, विशेषतः महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा प्रभावी लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच “निरोगी गाव, निरोगी समाज” या संकल्पनेच्या दिशेने ही आरोग्य उपकेंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या वतीने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये या दोन आरोग्य उपकेंद्रांची भर पडली आहे.