-
--
🚨 गाळ काढण्याचे काम सुरू; परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्यावर भर
नागपुरातील प्रसिद्ध फुटाळा तलाव परिसरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. तलावात साचलेला गाळ JCBच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू असून, काढलेला गाळ ट्रकमधून अन्यत्र नेऊन त्याची विल्हेवाट लावली जात आहे. गणेशोत्सवापूर्वी तलाव परिसराची स्वच्छता, देखभाल आणि सुशोभीकरण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. गणेशोत्सवादरम्यान फुटाळा परिसरात नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे. स्वच्छ फुटाळा, सुंदर नागपूर!