“Courage allows us to face challenges with confidence and transform obstacles into opportunities for growth.”
"With faith in God and confidence in yourself, nothing is impossible."
The Less Competent should not judge the More Competent.
“If you are patient in one moment of anger, You will escape a hundred days of sorrow.”
“You will face many defeats in life, but never let yourself be defeated.”
Keep doing your best every day & if no one is proud of you, be proud of YOURSELF!
तीन रोगनायल का लोकार्पण ।
Share News:
Good Morning Nagpur
नागपूर जिल्ह्यात आरोग्य सेवेला बळकटी; तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण
ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या व अत्यावश्यक आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांना नवीन रुग्णवाहिका मा.ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री, महसुल, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांचे शुभहस्ते, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर समर्पित करण्यात आल्या. या रुग्णवाहिकांमुळे दुर्गम व ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवा उपलब्ध करून देणे अधिक सुलभ होणार आहे.
याअंतर्गत नरखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मोवाड, पारशिवनी तालुक्यातील फिरते आरोग्य पथक, अंबाझरी तसेच रामटेक तालुक्यातील फिरते आरोग्य पथक, पवनी यांना प्रत्येकी एक अशा एकूण तीन रुग्णवाहिका आरोग्य सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या.
नवीन रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णांची सुरक्षित वाहतूक, माता-बाल आरोग्य सेवा तसेच विविध आरोग्य मोहिमांच्या प्रभावी अंमलबजावणीस मोठी मदत होणार आहे. विशेषतः फिरते आरोग्य पथक च्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यास या रुग्णवाहिकांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.
“आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकापर्यंत वेळेत आणि प्रभावीपणे पोहोचली पाहिजे,” या उद्देशाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, तीन रुग्णवाहिकांच्या समर्पणामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला आणखी बळकटी मिळाली आहे.
सदर कार्यक्रमाला मा.विभागीय आयुक्त, नागपूर श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, नागपूर महानगरपालीका आयुक्त डॉ.विपीन इटनकर, मा.जिल्हाधिकारी, नागपूर श्री.कुमार आशिर्वाद, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर श्री.विनायक महामुनी, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर डॉ.राजकुमार गहलोत, तसेच अति.जि.आ.अ. डॉ.रेवती साबळे, डॉ.असिम इनामदार, डॉ.माधुरी काळे व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.