Daily Wisdom Drop
  • “Courage allows us to face challenges with confidence and transform obstacles into opportunities for growth.”
  • "With faith in God and confidence in yourself, nothing is impossible."
  • The Less Competent should not judge the More Competent.
  • “If you are patient in one moment of anger, You will escape a hundred days of sorrow.”
  • “You will face many defeats in life, but never let yourself be defeated.”
  • Keep doing your best every day & if no one is proud of you, be proud of YOURSELF!

पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील VIP दर्शन बंद आषाढी यात्रेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Share News:
पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील VIP दर्शन बंद आषाढी यात्रेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय Good Morning Nagpur

पंढरपूर:
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील VIP/DVIP दर्शन व्यवस्था 10 जुलैपासून पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी यात्रेदरम्यान पंढरपुरात लाखो वारकरी आणि भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य मिळावे, दर्शनाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि गर्दीचे योग्य नियोजन व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.

यात्रेदरम्यान मंदिर परिसरात वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, नो-एंट्री झोन आणि गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. प्रशासनाने भाविकांना नियमांचे पालन करण्याचे आणि यात्रेदरम्यान सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.